Pune crime news हप्ता न दिल्यामुळे किराणा दुकानदारावर चाकू हल्ला, कोथरूडमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किराणा माल दुकानदाराने हप्ता न दिल्याच्या रागातून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना 20 जानेवारीला रात्री साडेनउच्या सुमारास कोथरूडमधील तुलशी सुपर शॉपीत घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार तिघांविरूद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप चौधरी (वय – 32, रा. कोथरूड ) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हे तुलसी सुपर शॉपीचे मालक असून 20 जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास ते दुकानात थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने शॉपीत येऊन दिलीप यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. मात्र, दिलीपने कसले पैसे द्यायचे अशी विचारणा केली. त्यावेळी चोरट्यांनी शॉपीतील पैशांचा गल्ला उघडून लुटीच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला. त्यांच्या दुकानातील स्कॅन मशीन चोरून नेउ लागले असता, दिलीपने त्यांना अडविले. त्यावेळी चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे पुढील तपास करीत आहेत.