पीएमपीएल बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना 21नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास खारावडे-पिंरगुट बसप्रवासात घडली. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी महिला 21 नोव्हेंबरला शास्त्री रोड परिसरातून पीएमपीएल बसमध्ये शिरल्या. त्यांना पिंरगुटला जायचे होते. काही वेळात बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 65 हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून खाली उतरल्यानंतर महिलेला सोन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस अमलदार मयूर भोसले तपास करीत आहेत.