
बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून तब्बल 1 लाख 80 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना 30 नोव्हेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक बसस्थानकावर घडली. याप्रकरणी वहिदा शेख (वय 52 रा. माहुली सातारा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादा महिला कामानिमित्त पुणे स्टेशन परिसरात आली होती. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक बसमध्ये शिरत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्याकडील पर्समधील 1 लाख 80 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार काळे तपास करीत आहेत.
येरवड्यात महिलेचे मंगळसूत्र चोरले
पुणे- कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 75 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 30 नोव्हेंबरला पावणेबाराच्या सुमारास येरवड्यातील नागपूर चाळ परिसरातील दुकानात घडली. या प्रकरणी 31 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अंमलदार थिकोळ तपास करीत आहेत.






























































