
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात तीन टी-20 सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने निर्भेळ यश मिळवले. तिन्ही लढतींमध्ये हिंदुस्थानच्या संघाने दमदार विजय मिळवत वर्चस्व गाजवले. या लढतीमध्ये फलंदाजांसह गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. मालिका संपल्यानंतर कर्णधार रोहितने गोलंदाजाने कौतुकही केले. या दरम्यान त्याने तब्बल 4 वर्षानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या आर. अश्विनवरही स्तुतिसुमने उधळली.
आर. अश्विन याने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन लढतीत चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्या लढतीत 4 षटकांची गोलंदाजी केली आणि 23 धावा देऊन 2 बळी घेतले, तर दुसऱ्या लढतीत त्याने 4 षटकांची गोलंदाज करताना 19 धावा देऊन एक बळी मिळवले. याचा अर्थ त्याने धावाही रोखल्या आणि दुसऱ्या बाजूने संघाला विकेट्सही मिळवून दिल्या. रोहित शर्माने देखील त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
कोणत्याही कर्णधारासाठी तो आक्रमक पर्याय असतो. जेव्हा तुमच्याकडे असा प्रकारचा गोलंदाज असतो तेव्हा मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची संधी असते आणि मधली षटके किती महत्त्वाची असतात हे आम्ही जाणून आहोत, असे रोहित शर्मा म्हणाला. दुबईमध्ये खेळल्यापासून त्याने शानदार पुनरागमन केले आहे. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, असेही रोहित म्हणाला.
टी-20 क्रिकेटने गोलंदाजांना ‘बॉलिंग मशीन’ बनवलेय, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर इयान चॅपेल यांची खंत
गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याने कसोटीमध्ये स्वत:ला सिद्ध केले असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड वाईट नाहीय. त्याने दुबईमध्ये आणि येथे न्यूझीलंडविरुद्ध दोन लढतींमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केले त्यातून त्याची योग्यता कळते, असेही रोहित शर्मा म्हणाला. तसेच मधल्या षटकांमध्ये धावा रोखणे आणि विकेट्स घेणे आवश्यक असते. अश्विनने अक्षर पटेलसोबत हे काम केले आहे. दोघेही विकेट्स घेण्यासाठी चांगला पर्याय आहेत, असेही तो म्हणाला.
दरम्यान, विराट कोहली टी-20 संघाचा कर्णधार असताना अश्विनला खूप कमी संधी मिळाली. टी-20 विश्वचषकातही त्याची तब्बल चार वर्षानंतर निवड झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र नंतरच्या तीन लढतीत त्याला स्थान मिळाले आणि त्याने अफगाणिस्तान विरुद्ध 4-14-2, स्कॉटलंडविरुद्ध 4-29-1 आणि नामिबियाविरुद्ध 4-20-3 अशी कामगिरी करत आपली दखल घेण्यास भाग पाडले होते.




























































