चन्नी गरीब नाहीत, त्यांच्याकडे…! सिद्धूच्या मुलीची स्फोटक विधाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत असून नवज्योतसिंग सिद्धू हे देखील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी राबिया ही मैदानात उतरले आहेत. राबियाने चरणजितसिंग चन्नी यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्याने राबियाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी तिने आपले वडील जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असा निर्धार केला आहे.

राबिया यांनी पत्रकारांशी बोलताना चन्नी यांच्यावर सडकून टीका केली. चन्नी यांची आपल्या वडिलांच्या आसपास उभी राहण्याचीही लायकी नसल्याचं राबियाने म्हटलंय. चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारी घोषित केल्याच्या मुद्दाबाबत विचारलं असता राबिया म्हणाली की हायकमांड तर हायकमांड असते, असतील त्यांच्या काहीतरी अडचणी. राबिया पुढे म्हणाली की इमानदार व्यक्तीला फार काळ रोखून धरता येत नाही. जो बेईमान असतो त्याला थांबावच लागतं. सिद्धू हे चन्नींपेक्षा जास्त श्रीमंत असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवण्यात आले नाही असा दावा केला जातोय. याबाबत बोलताना राबियाने म्हटले की चन्नी कुठले गरीब आहेत? त्यांचं खातं उघडून पाहा त्यात 133 कोटी रुपये सापडतील.