टिटवाळ्यात अनधिकृत झोपडपट्टी हटवल्याने नागरिकांचा रेल रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टिटवाळा

टिटवाळ्यात अनधिकृत चाळी हटवल्याप्रकरणी नागरिकांनी टिटवाळा आंबिवली दरम्यान रेले रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. आधीच मेगाब्लॉक असल्याने त्यात नागरिकांनी रेले रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळाकरिता विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना रुळावरून हटवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

शुक्रवारी वनविभागाने अनधिकृत ४०० घरे तोडली. त्याच्या निषेधार्थ या रहिवाशांनी रुळावर उतरून महानगरी एक्सप्रेस रोखली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनर्त्यांना हटवले आणि वाहतून सुरळीत केली. ज्या नागरिकांनी हा रेल रोको केला ते परप्रांतीय होते अशी प्राथमिक माहिती आहे.