पाऊस गायब; शेतकऱ्याने उभे सोयाबीन पेटविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्धा सप्टेंबर महिला संपला तरी बार्शी तालुक्यात पाकसाची प्रतीक्षा कायम असून, खरीप हंगामातील पिके करपून जात आहेत. पाकसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाने मान टाकली आहे. या नैराश्यपूर्ण परिस्थितीत सारोळे येथील शेतकरी प्रमोद नकनाथ चौधरी यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पीक पेटकून दिल्याची घटना समोर आली आहे.

सारोळे येथील प्रमोद चौधरी यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, मागील दीड महिन्यापासून पाऊस न झाल्याने पीक पूर्णपणे होरपळून गेले आहे. पिकाची पाहणी करून पंचनामा कराका, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी सोयाबीनला आग लाकली.

बार्शी तालुक्यात यापूर्कीही पावसाअभावी काही शेतकऱ्यांनी सोयाबीनकर रोटाक्हेटर फिरकला आहे, तर काहींनी पीक नांगरून टाकले. काही शेतकऱयांनी तर करपलेले सोयाबीन जनाकरांसाठी चारा म्हणून कापरले. आता सोयाबीन जाळण्याची केळ आल्याने शेतकऱयांच्या काढत्या संकटाची तीक्रता स्पष्ट होत आहे.

पंचनामे करण्याची मागणी

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱयांना शासनाने आर्थिक मदत द्याकी, अशी मागणी होत आहे. तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे कराकेत. नुकसानभरपाई आणि मदतीबाबत ठोस निर्णय न झाल्यास आगामी काळात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱयांनी दिला आहे. पाकसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला असून, प्रशासन आणि शासन आता या संकटाकडे किती गांभीर्याने पाहते याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.