राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

यंदा मॉन्सूनने सर्वांना चांगलीच प्रतीक्षा करायला लवाली. मात्र, त्यानंतर पावसाने दमदार आगमन करत राज्यात सर्वत्र मुसळधार बरसला. मुंबईतही पावसाने दमदार बँटिंग केली. काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस बरसत आहे. आता पुढील पाच दिवसही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच काही ठिकाणी अलर्टही जारी केला आहे.

पुण्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. आता मंगळवारपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार असून या आठवड्यात पुणे, मुंबईसह राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. आगामी 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणाला हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईतही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात पुढील 5 दिवस विजांसह पावसाची शक्यता व्रतवण्यात आला आहे.

पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट व जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.