
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांनी सरकारशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. सरकारने निमंत्रण दिले तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. 22 जानेवारीला ज्या मुद्दय़ांपर्यंत चर्चा येऊन थांबली होती तेथून पुढे चर्चा सुरू केली जाईल. परंतु आमच्या मागण्यांमध्ये कोणताही बदल नसेल, अशी ठाम भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी रविवारी मांडली.
सरकारने जर संयुक्त किसान मोर्चाला चर्चेसाठी निमंत्रण धाडले तर त्यावर किसान मोर्चा विचार करेल. तिन्ही कृषी कायदे मागे घेणे, एमएसपीसाठी कायदा या मुद्दय़ांवर चर्चा करू. शेतकऱयांच्या आधीच्याच मागण्या कायम असतील, असे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले.
























































