
कायम चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. आंबोली पोलिसांनी ही कारवाई केली असून अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विट करत ही बातमी दिली आहे.
राखी सावंत आज तीन वाजता नवरा आदिल खान दुर्रानीसोबत तिच्या डान्स अॅकेडमीचे उद्घाटन करणार होती. मात्र त्याआधीच अंबोली पोलिसांनी शर्लिन चोप्रा केसप्रकरणात तिला अटक केली आहे. गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी राखी सावंतला अटक करण्यात आली.
शर्लिन चोप्राने ट्विट करत लिहीलेय की, ताजा खबर….आंबोली पोलिसांनी एफआयआर 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा एबीए 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला असल्याचे ट्विट केले आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंतने एका पत्रकार परिषदेत शर्लिनचा अश्लिल व्हिडीओ दाखवून अर्वाच्च भाषा वापरली होती. त्याविरोधात शर्लिनने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
.

























































