
राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांचे आज रत्नागिरीकरांनी तंतोतंत पालन करायला सुरूवात केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, खासगी कार्यालये बंद होती. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची अन्टीजेन चाचणी करण्यात येत होती.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. प्रत्येक नाक्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाचा फिरण्यास परवानगी असल्याने पोलीस रस्त्यावरून फिरणाऱ्यांची चौकशी करत होते. ओळखपत्राची तपासणी करत होते.
शहरातील मारूतीमंदिर येथे अनावश्यक फिरणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत होती. पोलिसांसोबत पोलीस मित्रही रस्त्यावर उभे राहून प्रशासनाला सहकार्य करत होते.




























































