
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील महिन्यापासून एमआरआयची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एमआरआयची सोय उपलब्ध झाल्यामुळे त्याचा गोरगरीबांना लाभ होणार असून खासगी रुग्णालयात होणाऱ्या लुटमारीपासून संरक्षण मिळणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार डॉ. भास्कर जगताप यांनी स्वीकारला. त्यानंतर दैनिक सामनाशी बोलताना डॉ. भास्कर जगताप म्हणाले की, जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारीवर्गही कमी आहे. 70 परिचारिकांची पदेही रिक्त आहेत. आता ज्या परिचारिका काम करतात त्यांचे खरेतर आभार मानले पाहीजेत, कारण परिचारिका नसतील तर रुग्णांना सेवा कशी देणार. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या परिचारीकांचे खूप मोठे सहकार्य लाभत आहे. पुढील महिन्यापर्यंत परिचारीकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. त्यामुळे. रुग्णांना सेवा देणे सोपे होईल, जिल्हा रुग्णालयात एमआरआयची सुविधाही उपलब्ध होणार आहे. 27 फेब्रुवारीला एक समिती येऊन निरिक्षण करणार आहे. त्यानंतर एमआरआयचौ सेवाही सुरु होईल. एमआरआय आणि सीटीस्कॅनची यंत्रणा हाताळण्याची जबाबदारी दुसन्या एजन्सीला देण्यात येईल असेही डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.

























































