धोनीच्या निवृत्तीबाबत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींचे मोठे विधान

769

विश्वचषकापासून मैदानावर पाऊल न ठेवणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘फिनिशर’ महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार की टी-20 वर्ल्डकपपूर्वी निवृत्ती घेणार यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धोनीला पुन्हा एकदा निळ्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत, परंतु त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे हे कोणाला माहिती नाही. निवड समिती धोनीचा पर्याय शोधत आहे, तर टीम इंडियाचे प्रशिक्षक, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि कर्णधार विराट कोहली देखील धोनीबाबत स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील धोनीच्या निवृत्तीवर भाष्य करणे टाळले आहे. शास्त्री यांना धोनीच्या भविष्याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, तो (धोनी) एक महान खेळाडू आहे. मी त्याला चांगला ओळखतो आणि तो कधीही स्वत:ला संघावर थोपवणार नाही. त्याला जर वाटत असेल आपण पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या रेसमध्ये आहोत, तर त्यावर कोणीही सवाल उपस्थित करायला नको.

dhoni

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून धोनी संघातून बाहेर आहे. याबाबत शास्त्रींना विचारले असता ते म्हणाले की, सध्या त्याला ब्रेक हवा आहे, मात्र तो आयपीएल खेळणार आहे. आयपीएलनंतर जर त्याला वाटले की आपण टीम इंडियाकडून खेळू शकतो तर त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू नये. निर्णय घेण्याचा अधिकार त्याचा आहे.

सचिन तेंडुलकरने 14 वर्षापूर्वी नोंदवलेला अशक्यप्राय विक्रम आठवतोय का?

टीम इंडियाच्या या फिनिशरने 90 कसोटी, 350 एक दिवसीय आणि 98 टी लढतींमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. धोनीच्या नावावर 17000 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद आहे. यासह एक दिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे त्याच्या नावावर 444 शिकार आहेत, तर कसोटीत 294 खेळाडूंना त्याने पवेलियनचा रस्ता दाखवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या