हिंदुस्थानी ऍथलेटिक्सला रिलायन्स इंडस्ट्रीजचा मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स इंडस्ट्रीजने हिंदुस्थानी क्रीडापटूंचा सर्वांगीण विकास आणि ऑलिंपिक चळवळीच्या वृद्धीसाठी ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियासह भागीदारी केली आहे. हिंदुस्थानी ऍथलीट्सची निवड करून त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांचा खेळ विकसित करणे तसेच या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षण आणि क्रीडा-विज्ञान आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करणे हे भागीदारीचे उद्दिष्टय आहे. आयओसीच्या सदस्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक नीता अंबानी म्हणाल्या, ऍथलेटिक्स ही जागतिक खेळातील सर्वात लोकप्रिय शाखांपैकी एक असून या संघटनेचा प्रमुख उद्देश मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रतिभेला संधी देण्याचा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून हिंदुस्थानी ऍथलेटिक्सच्या वृद्धीला गती देण्याचा आहे. आम्ही आमचे आणखी काही तरुण खेळाडू लवकरच जगभरात विजयाच्या शिखरावर पोहोचलेले अनुभवणार आहोत.