
हिंदुस्थानचा 74वा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा करण्यात आला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी उपस्थित होते. इजिप्तच्या राष्ट्रपतींसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले होते.
गुरुवारी 26 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर कर्तव्य पथावर हिंदुस्थानी लष्कराकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आले. यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी प्रोटोकॉल मोडून राष्ट्रपतींच्याही पुढे जाऊन पाहुण्यांची भेट घेताना दिसत आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांकडूनच हा प्रोटोकॉल पाळला जात नसल्यास तो राष्ट्रपतीपदाचा अपमान ठरेल, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. यात त्यांनी पीएमओ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कार्यालयाला टॅग केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांकडूनच हा प्रोटोकॉल पाळला जात नसल्यास तो राष्ट्रपतीपदाचा अपमान ठरेल. pic.twitter.com/rrCCuXaCX3
— NCP (@NCPspeaks) January 27, 2023
…तर 34 नव्हे 40 खासदार निवडून येतील!
दरम्यान, ‘इंडिया टूडे सी वोटर मुड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा 40 च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
जनतेचा कौल कोणत्या दिशेने, लक्षात घ्या!
उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे असेही महेश तपासे म्हणाले. ‘सी वोटरचा’ जो सर्व्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना खूप कमी टक्केवारी दिसते याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असेही महेश तपासे यांनी सांगितले.






























































