
मुंबई येथे असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कार्यालयाला ईमेलद्वारे ही धमकी मिळाली असून त्या बदल्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
आरबीआयच्या कार्यालयाखेरीज एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेसहित 11 ठिकाणांवर बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा उल्लेखही या धमकीत आहे. या सर्व ठिकाणांवर पोलिसांनी शोधमोहिम राबवली. पण, या सर्व ठिकाणांवर काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.



























































