
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत निवृत्त पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. नगर-पुणे महामार्गावरील सुपा परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.
लक्ष्मण रामभाऊ सांबळे (70, रा. सुपा, ता. पारनेर) असे मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱयाचे नाव आहे.
लक्ष्मण साबळे हे बुधवारी रात्री सात ते आठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर सुपा येथील सफलता हॉटेलजवळ रस्ता ओलांडून सुपा गावच्या दिशेने येत होते. त्याचवेळी नगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने साबळे यांना धडक दिली. यात ते जबर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुपा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

























































