Photo – ‘हिटमॅन’चा नवा कारनामा, विराट-गप्तीलच्या पंक्तित मिळवले स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा कारनामा केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहित शर्माच्या 3 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.

टी-20 वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्ध रोहितने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन हजार धावांचा टप्पा पार केला.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा रोहित तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचा मार्टिन गप्तील आणि हिंदुस्थानच्या विराट कोहली याने अशी कामगिरी केली आहे.

विराट कोहली पहिल्या स्थानावर असून त्याच्या नावावर 3227 धावांची नोंद असून मार्टिन गप्तील 3115 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.