
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे काय असा सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना केल्यानंतर त्यांनी स्फोटक उत्तर दिले. माझी इच्छा आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची इच्छा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझी निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी अमित शहा यांची काय इच्छा आहे. त्याला महत्त्व असल्याचे स्वामी यांनी सांगितले. वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या स्वामी यांनी या विधानाने त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. स्वामी यांनी भाजपवर संघाचा प्रभाव असल्याचाही दावा केला आहे.
BJP cannot survive without RSS. Understand that RSS is the power plant. We MPs are bulbs which shine on getting electricity or can get fused. But RSS does not micro manage BJP and its macro perspective is complex. This I learnt the hard way. PTs should learn this
— Subramanian Swamy (@Swamy39) March 21, 2019
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशिवाय भाजप वाटचाल करू शकत नाही असा दावाही स्वामी यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ पॉवर प्लांट आहे, तर पक्षाचे खासदार बल्ब आहेत. खासदारांना पॉवर प्लांटमधून वीजपुरवठा झाल्यावरच ते प्रकाश देतात असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा भाजपवर प्रभाव असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी करण्यात येतो. संघाच्या सल्लानेच भाजप सरकार निर्णय घेते असा आरोपही विरोधक करतात. मात्र, भाजपकडून या आरोपांचे खंडन करण्यात येते. मात्र, स्वामी यांनी आपल्या वक्तव्यातून संघाचा भाजपवर प्रभाव असल्याचा दावा केला आहे. संघाशिवाय भाजप वाटचाल करू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. संघाचा प्रभाव झुगारून भाजप वाटचाल करू शकतो काय या प्रश्नावर असंभव आहे असे उत्तर त्यांनी दिले.

























































