
रुपारेल काॅलेजची विद्यार्थिनी असणाऱया श्रावणी रमेश तेलीने पहिल्या इंडिया तायक्वांडो यूथ नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. 29 ते 31 जुलै 2026 दरम्यान कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम इथे ही स्पर्धा पार पडली. फिनिक्स अकादमीचे प्रशिक्षक मास्टर राजेश खिल्लारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. मुंबई पोलीस खात्यात वरळी येथील एल.ए. विभागात सेवेत असणारे रमेश तेली यांची श्रावणी तेली ही मुलगी आहे. रमेश तेली हेदेखील आंतरराज्य पातळीवरील हातोडाफेक आणि भालाफेक स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेते खेळाडू आहेत. श्रावणी ही रुपारेलमध्ये कला शाखेत पदवीच्या प्रथम वर्षीचा अभ्यास करत आहे.




























































