कोरोना, इंधन भडक्याने बँका बेजार, आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार किमान 3 वर्षे

कोरोना महामारीचा मार आणि त्यातच इंधन दरवाढीचा फटका यामुळे जगभरातील बँकिंग क्षेत्राचे पार कंबरडे मोडले आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसाय गेले सात महिने बंद राहिल्याने बँकांच्या आर्थिक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.अशा स्थितीत पुन्हा आपल्या व्यवसायाचा डोलारा पूर्ववत करण्यासाठी जगातील बँकांना किमान 3 वर्षांचा कालावधी तरी लागेल, असे मत एस अँड पी ग्लोबल रेटिंगच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आले आहे.

‘त्या’ बँका लवकर सावरतील
कोरोना महामारीत काही मोजक्याच देशांच्या बँकिंग क्षेत्राला कमी फटका बसला आहे.त्यात चीन , कॅनडा ,सिंगापूर आणि सौदी अरेबिया या देशांच्या बँकांचा समावेश आहे. या देशांतील बँका लवकर म्हणजे 2022 च्या अखेरपर्यंत सावरू शकतील असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या