ऑस्ट्रेलियाला चेपून टाका, सचिनचा हिंदुस्थानी संघाला सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बारकाईने बघत असून त्याने हिंदुस्थानी संघाने आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. सचिनने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की मी आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाला कधीही इतक्या बचावात्मक मानसिकतेत बघितलं नव्हतं. हिंदुस्थानी संघाने या संधीचा पूर्ण फायदा उचलला पाहीजे आणि सामन्यावर मिळवलेली पकड आणखी घट्ट करायला पाहिजे. या ट्वीटमध्ये त्याने रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीचेही कौतुक केले आहे.

हिंदुस्थानी संघाचा पहिला डाव 250 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या दिवस अखेर सात फलंदाज तंबूत परतले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 विकेटच्या मोबदल्यात 191 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्यापही 59 धावांनी पिछाडीवर असून तिसऱ्या दिवशी शेपूट लवकर गुंडाळून आघाडी घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.