
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अज्ञातांकडन धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनाडमध्ये हे धमकीचे पत्र सापडले आहे. या पत्रात सलमान खान आणि सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे.
सलीम खान रोज मॉर्निक वॉकनंतर ज्या ठिकाणी बसतात, तेथे त्यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र सापडले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या पत्रात तुमची स्थिती सिद्धू मुसेवालासारखी करू अशी धमकी सलमान आणि सलीम खान यांना देण्यात आली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर आहे. याआधी 2018 मध्ये बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली होती.































































