
सॅमसंगच लवकरच Samsung Galaxy A13 5G हा फोन लॉन्च होणार आहे. लॉन्चपूर्वीच या फोनचे फीचर ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 GB चा रॅम देण्यात आला आहे. इंटर्नल स्टोरेजमध्येही ग्राहकांना पर्याय देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A13 5G चे फीचर
Samsung Galaxy A13 5G या फोनमध्ये ग्राहकांना रॅम आणि इंटर्नल मेमरीमध्ये पर्याय देण्यात आला आहे. त्यात 6 GBचा रॅम असलेल्या फोनमध्ये 64 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. तर 6 GB रॅममध्ये 128 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. 8 GB रॅम असलेल्य फोनमध्ये 128 GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून 25 W फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे.
50 मेगापिक्सल कॅमेरा
Samsung Galaxy A13 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. तसेच क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिस्कचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सचला अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्ससला कॅमेरा देण्यात येणार आहे.
Samsung Galaxy A13 5G ची किंमत
Samsung Galaxy A13 5G च्या 4 GB आणि 64 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 13 हजार 99 इतकी असणार आहे. तर 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 16 हजार 499 इतकी आहे.






























































