संगमेश्वरात धामणी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर धामणी येथे अवधूत भारत मेस्त्री (19 ) (रा. धामणी काकवलवाडी) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत चंद्रकांत शांताराम सुतार यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिली.

अवधूत हा घरामध्ये एकटा होता. त्याचे वडील कोंबड्यांसाठी खाणे आणण्यासाठी सकाळी बाहेर गेले होते. सकाळी 10.25 वा दरम्यान अवधूतने घरातील कोंबड्यांच्या शेडमधील लोंखडी बारला नायलॉनच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. अवधूत याने गेल्या वर्षीच बारावी पूर्ण केली होती. चांगले मार्कही मिळाले होते. त्याचा स्वभावही मनमिळावू होता. त्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .