संगमेश्वर – जोरदार पावसामुळे शंभर वर्षांपूर्वीचे झाड घरावर कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर येथील कोंडीवरे जोरदार पावसामुळे शंभर वर्षांपूर्वीचे झाड कोसळून बौद्धवडीतील एका घराचे नुकसान झाले आहे. गेले तीन दिवस आरवली माखजन पंचक्रोशीत जोरदार पाऊस लागत आहे. मंगळवार मध्यरात्री कोंडीवरे बौद्धवडीत शंभर वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड उन्मळून पांडुरंग धर्माजी गमरे यांच्या घरावर कोसळल्याने पडवीच्या छपराचे नुकसान झाले.

याची खबर महसूल विभागाला कळविण्यात आल्यावर तलाठी घाग यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच सायली केंबळे, उपसरपंच जाकीर शेकासन, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, ग्रामसेवक संदीप शेडगे, बबन कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सदरचे झाड विद्युत तारांवर कोसळल्याने ताराही तुटल्या आणि वीज पुरवठा खंडित झाला.