सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
सानपाडा येथील प्रस्तावित मशिदीच्या विरोधी येथील नागरिकांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सेक्टर आठमधील मशिदीच्या विरोधातील मोर्चात महिलांनी देखील लक्षणीय सहभाग घेतला आहे.
रास्ता रोकोवेळी जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देण्यात येत आहेत. येथे हिंदूबहूल भाग आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य आहे. येथे अगदी कमी संख्येत मुस्लीम आहेत. तेथील कुटुंबांना कोणताही त्रास झालेला नाही. मशिदीची गरज नसताना देखील येथे मशीद बांधली जात असल्यास त्याचा विरोध राहिलच अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

























































