
दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा धक्का दिला आहे. कराड याने जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पिटीशन) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सत्र व उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुप्रीम कोर्टाने जामिनास नकार दिला. या फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी कराडच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर १४ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करत न्यायालयाने आपला निर्णय देताना ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही कृती किंवा चूक नाही, ज्यामुळे त्यावर पुन्हा पुनर्विचार करण्याची आवश्यकता भासेल, अशी टिप्पणी नोंदवली. कराडची पुनर्विलोकन याचीका फेटाळून लावली आहे.





























































