
मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर आता सॅटेलाइटची नजर राहणार आहे. या सॅटेलाइट इमेजमुळे मोकळय़ा जागेवर होणाऱ्या बेकायदा बांधकामांची ऑनलाइन माहिती पालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणेही शक्य होणार असून शहराच्या विद्रुपीकणाला आळा घालणे शक्य होणार आहे.
मुंबईतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी संबंधित विविध प्राधिकरणांनी समन्वय साधून कार्यवाही होण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्राधिकरणांची बैठक आज पार पडली. यावेळी जोशी यांनी ही माहिती दिली. अतिक्रमण निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे योग्य नियोजन करून अतिक्रमण निष्कासनाची कार्यकाही तत्काळ सुरू करावी. जेणेकरून आरक्षित जागा मोकळ्या होतील व नागरिकांना दिलासा मिळेल.
विविध भागात निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी संबंधित परिमंडळांचे उप आयुक्त व महानगरपालिका परिक्षेत्रातील संबंधित प्राधिकरण क उपक्रमाचे अधिकारी यांना संबंधित पोलीस ठाण्याकडून लागणारे मनुष्यबळ त्वरित उपलब्ध करून दिले जाके. शासनाचे विविध आरक्षण असलेले मोकळे व अतिक्रमणमुक्त केल्यानंतरचे भूखंड महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाच्या 2016 च्या अधिसूचनेप्रमाणे वर्ग करावेत, असे निर्देशही जोशी यांनी दिले आहेत.
अनधिकृत बांधकामाबाबत प्रतिबंधात्मक कारकाई प्रभावीपणे करण्यासाठी ज्या प्राधिकरणांनी अद्याप नेमणूक केली नाही त्यांनी त्वरित पदनिर्देशित अधिकारी यांची नेमणूक करावी, तसेच उपकरप्राप्त इमारतीमध्ये करण्यात येणाऱ्या दुरुस्ती परवानगीबाबतची संपूर्ण माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी संबंधित महानगरपालिकेला उपलब्ध करून द्यावी. मुंबई इमारती प्रस्ताव व दुरुस्ती मंडळाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.




























































