
सामना ऑनलाईन । श्रीनगर
देशात होळी-धुळवडीचा उत्सव साजरा होत असताना जम्मू-कश्मीर आणि सीमाभागात मात्र तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड फेकले आहेत. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी सपूर्ण विभागाला घेरले असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
#UPDATE Two policemen including an SHO injured after terrorists attacked Police cordon in Sopore. #JammuAndKashmir https://t.co/WtACPkLT7H
— ANI (@ANI) March 21, 2019
दरम्यान, पाकिस्तानने काही भागात आज सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे देखील वृत्त आहे. यावेळी सुरू असलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचे कळते आहे.




























































