आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांना मोफत बियाणे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांना मोफत बि-बियाणाचे वाटप करण्यात आले. नितीन धांडे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात 100 शेतकऱ्यांना आधार देण्यात आला.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने नितीन धांडे यांनी शेतकर्‍यांना मोफत बि-बियाणे वाटपाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी कृषी विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण कासट, प्रमोद निनाळ, मराठवाडा विभागाचे प्रमुख निजुड सिड पवार, तालुकाध्यक्ष भिमा काळे, हनुमान बियाण, विठ्ठल बहीर, सचिव अजिनाथ आदमाने हे उपस्थित होते. यावेळी शंभर शेतकर्‍यांना बि-बियाणे वाटप करण्यात आले. निसर्गाने साथ न दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे गरजू शेतकर्‍यांची निवड करुन मोफत बि-बियाणे वाटप करण्यात आले.