
अमेरिका-इराण यांच्यात शांतता कराराच्या आशांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट आणि त्यातून मिळालेला आधार यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या प्रमुख निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात आपली तेजी कायम राखली. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स 544 अंशांनी वधारून 78,639 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 391 अंशांनी वाढून 24,774.30 वर बंद झाला. याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना झाला असून गुंतवणूकदारांनी तब्बल 4 लाख कोटी रुपये कमावले आहेत.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील जवळपास 486 लाख कोटी रुपयांवरून वाढून 490 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. केवळ सलग चार सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,850 हून अधिक अंशांनी वधारला आहे, तर निफ्टी 50 मध्ये जवळपास 800 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 50 इंडेक्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, टीसीएस, इंडिगो, इन्पहसिस, श्रीराम फायनान्स आणि ऑक्सिस बँक सर्वात जास्त लाभ देणारे शेअर्स ठरले.



























































