जुन्या क्रिकेट चेंडूंना नवं आयुष्य, ए3 स्पोर्ट्स क्राफ्टची भन्नाट इनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरावानंतर काही दिवसांतच निकामी होणारे क्रिकेटचे चेंडू आता पुन्हा नव्यासारखे वापरता येणार आहेत. मुंबईतील ए3 स्पोर्ट्स क्राफ्टने ए3 रीक्राफ्टेड उपक्रमातून वापरलेल्या लाल आणि पांढऱया क्रिकेट चेंडूंवर अत्याधुनिक प्रक्रिया करून त्यांना सरावासाठी पुन्हा तयार करण्याची अभिनव संकल्पना यशस्वी केली आहे. स्पोर्ट्स क्राफ्टच्या या नव्या भन्नाट प्रयोगामुळे जुन्या चेंडूंना नवं आयुष्य लाभणार आहे.

सरफेस रेस्टोरेशन, कोअर

स्टॅबिलायझेशन आणि फिनिशिंग या प्रक्रियांमुळे चेंडूचा आकार, वजन, सीम आणि कामगिरी नव्या चेंडूप्रमाणेच राखली जाते. त्यामुळे अकादमी आणि क्लबच्या क्रिकेट साहित्यावरील खर्चात तब्बल 50 ते 60 टक्के बचत होत असून पर्यावरणपूरक सर्क्युलर इकॉनॉमीलाही चालना मिळणार आहे.

या उपक्रमाचे हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरसह चंद्रकांत पंडित, साबा करीम, सुरेंद्र भावे आणि करसन घावरी यांनी काwतुक केले आहे. मुंबई क्रिकेट संघटना, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि विदर्भ क्रिकेट संघटनांनीही या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून तळागाळातील क्लब व अकादमींसाठी ही संकल्पना मोठा दिलासा ठरणार आहे.