Ratnagiri News – मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात बुडून प्रौढाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराजवळील मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात प्रौढ आढळला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सुहास रघुनाथ मांडवकर ( ४३, रा. मुरुगवाडा, सचिन पिलणकर यांच्याकडे भाड्याने, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

ही घटना शनिवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास निदर्शनास आली. मयत सुहास मांडवकर यांना दारुचे व्यसन होते. शनिवारी सकाळी खबर देणार दिपक रघूनाथ मांडवकर यांना त्यांचा भाऊ मृत सुहास मांडवकर हा मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात दिसत असल्याचे मित्र राजू बिर्जे यांनी सांगितले. दिपक यांनी मिरकरवाडा जेटी येथे खात्री केली असता तो त्यांचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. सुहास याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.