
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारने बळाचा वापर केल्याचा आरोप करत, संसदेत उपस्थित न राहून पंतप्रधान मोदी हे संसद आणि मतदारांचा अपमान करत असल्याची बोचरी टीका खरगे यांनी केली आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
संसद भवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, याप्रकरणी विरोधी पक्षाने नव्हे, तर खुद्द पंतप्रधानांनी देशातील तरुणांची माफी मागितली पाहिजे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि पेलेट गनच्या वापरासाठी पंतप्रधान मोदींनी माफी मागायला हवी, असे ते म्हणाले. संसदेत येऊन प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी ते विद्यार्थ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधानांवर संसदेची जबाबदारी टाळल्याचा आरोप करताना खरगे म्हणाले की, पंतप्रधान सभागृहात येत नाहीत आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. श्रीराम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांच्या चोरीवर ते काहीही बोलत नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरही त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याच्या प्रयत्नांवरही खरगे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. निष्पाप मुले ही देशद्रोही नसतात, त्यामुळे त्यांना तसे लेबल लावू नये. लोकशाही चिरडणारे भाजपमधील नेतेच खरे देशद्रोही आहेत, असा पलटवार खरगे यांनी केला.
माफ़ी तो मोदी जी को माँगनी चाहिए,
युवाओं पर लाठी-pellet gun चलाने के लिए,
…पर वो संसद में आने के बजाय,
बच्चों को डरा-धमका रहे हैं।सदन में आते नहीं, उत्तर नहीं देते,
न श्री राम मंदिर के चंदा-चढ़ावा चोरी पर बोलते हैं,
ना ही छात्रों के दमन पर कुछ कहते हैं।मासूम बच्चें… pic.twitter.com/OG76czqOAV
— Mallikarjun Kharge (@kharge) August 3, 2026




























































