१८ वषाचा दुष्काळ तन्वी शर्माने संपवला, सायना नेहवालनंतर तैपई ओपन जिंकण्याचा पराक्रम; व्हिएतनामच्या थुई लिन्ह गुयेनवर सरळ गेममध्ये मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बॅडमिंटनमधील उदयोन्मुख खेळाडू १७ वर्षीय तन्वी शर्मा हिने तैपेई ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीने व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुई लिन्ह गुयेनचा २१-१६, २१-१६ अशा सरळ गेममध्ये अवघ्या ३६ मिनिटांत पराभव केला. हा तन्वीच्या कारकिर्दीतील पहिलाच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर किताब ठरला.

पंजाबच्या तन्वी शर्मान या विजयानिशी २००८ मधील सायना नेहवालनंतर तैपेई ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा मान मिळवला. गेल्या वर्षी यूएस -ओपन सुपर ३०० स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या तन्वीने यावेळी मात्र विजेतेपदावर नाव कोरले.

पहिल्या गेममध्ये तन्वीने दमदार सुरुवात करत १०-२ अशी -आघाडी घेतली. काही किरकोळ चुका झाल्याने प्रतिस्पर्धनि पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र तन्वीने संयम राखत २१-१६ असा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये थुई लिन्हने ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र तन्वीने सलग गुणांची कमाई करत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिने संपूर्ण सामन्यावर पकड ठेवत पुन्हा २१-१६ असा गेम जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

प्रशिक्षकांनाच घातले सुवर्णपदक
तन्वीला हिंदुस्थानची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूचे माजी प्रशिक्षक पार्क ते-सांग मार्गदर्शन करत आहेत. विजेतेपदानंतर तन्वीने आपल्या गळ्यातील सुवर्णपदक काढून ते प्रशिक्षक पार्क ते-सांग यांच्या गळ्यात घातले. या भावनिक क्षणानंतर दोघांनी एकत्र छायाचित्रही काढले. अंतिम फेरी गाठणारी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू १७ वर्षे २२२ दिवसांच्या वयात तन्वी शर्मा तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात कमी वयाची अंतिम फेरी गाठणारी खेळाडू ठरली. तिने कोरियाच्या ली योंग डे यांचा विक्रम मोडला. ली यांनी २००६ मध्ये १७ वर्षे २८७ दिवसांच्या वयात पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती.