सोन्याच्या महागाईमुळे सुवर्णकारांवर बेरोजगारी ओढवली, सुवर्णकार संघाच्या सभेत विविध समस्यांवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी सुवर्णकार संघाची जाहीर सभा पारसनगर येथील शिवसेना शाखा सभागृहात समाजबांधवांच्या गर्दीत आणि उत्साहात पार पडली. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका लोना रावत, संघाचे राजन चाचड आणि अखिल भारतीय सुवर्णकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन मसुरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या सभेत सुवर्णकारांना भेडसावणाऱया विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनसला होणारा विलंब, जागतिक युद्धामुळे सोन्याच्या दरात होणारी बेसुमार वाढ, पंतप्रधानांनी सोने खरेदी करू नका अशी केलेली घोषणा परिणामी सुवर्णकारांवर ओढवलेली बेरोजगारी त्यांना करावे लागणारे स्थलांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री व अर्थ मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सुवर्णकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन मसुरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस कालिदास कांदळगावकर यांनी केले.