
खाडी किनारी वाळूमाफिया हैदोस घालतात तो रोखण्यासाठी आता खासगी किंवा शासकीय इमारत बांधतांना वाळूची ऑनलाइन नोंद करून ती खरेदी करावी लागेल असे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या समाधान शिबिरासाठी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे रत्नागिरीत आले होते.
डिसेंबरच्या अधिवेशनात आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असा लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले. नवीन कायद्यामध्ये जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात झालेल्या. तलाव घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. संगमेश्वर तहसीलदारांबाबत अनेक तक्रारी होऊन त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. महसूल खाते पूर्वीपासूनच बदनाम होते, त्यामध्ये बदल करून ते सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.





























































