ही भाजपच्या अंताची सुरुवात; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर TMC चा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवाराचा मोठ्या आघाडीने पराभव केला आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून, ही भाजपच्या अंताची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

डेरेक ओ’ब्रायन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठ्या अक्षरांत “BEGINNING OF THE END” असे लिहित भाजपच्या सद्यस्थितीचे वर्णन चार पॉइंटर्स मांडत केले आहे.

१: मोदी-शहांनी बिहारमधील एका फारशा परिचित नसलेल्या आमदाराला (नितीन नवीन यांच्या संदर्भात) उचलून आपला रबर स्टॅम्प राष्ट्रीय अध्यक्ष बनवले.

२: भाजपने तब्बल ५२,००० मतांनी जिंकलेली बांकीपूर विधानसभेची जागा रिक्त झाली.

३: भाजपने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आणि नंतर तो बदलावा लागला.

४: पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, बिहारमधील बांकिपूर पोटनिवडणूकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 18 हजार मतांनी पराभव केला आहे. किशोर यांच्या विजयाने गेली 30 वर्ष सत्ता असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला.