एखाद्या चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवा, प्रशांत किशोर यांची सम्राट चौधरी यांच्यावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांकीपूर पोटनिवडणुकीत मोठी आघाडी घेतल्यानंतर जन सुराज’पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या आघाडीदरम्यान त्यांनी बांकीपूरचा विकास आणि बिहारच्या राजकारणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. प्रशांत किशोर म्हणाले की, बांकीपूरच्या जनतेने दिलेल्या आशीर्वाद आणि विश्वासाचा आदर करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. “माझ्या आमदार होण्याने बांकीपूर रातोरात बेंगळुरू होणार नाही, आणि मला कोणतीही मोठी आश्वासने द्यायची नाहीत. मात्र बांकीपूरला उत्तम बनवण्यासाठी जे काही शक्य असेल ते केले जाईल आणि येत्या दोन-तीन महिन्यांतच येथे काही सुधारणा नक्कीच दिसू लागतील,” असे ते म्हणाले. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, “बांकीपूरच्या जनतेने भाजपाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की, बिहारचा मुख्यमंत्री एखाद्या चांगल्या व्यक्तीला बनवले जावे. जर गुन्हेगाराला मुख्यमंत्री बनवले, तर राज्याची प्रगती होणार नाही.

प्रशांत किशोर म्हणाले की, जर भाजपाला सम्राट चौधरी यांना हटवून कुशवाह समाजातील दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे असेल, तर तो पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. याला आपली कोणतीही हरकत नाही. मात्र ज्याची निवड केली जाईल, तो कुशवाह समाजातील एक सक्षम आणि प्रामाणिक व्यक्ती असावा.