
कोकण रेल्वेच्या पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे ट्रॅकवर अनोळखी तरुणाचा छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हा मृतदेह रविवार 2 ऑगस्ट रोजी रात्री आठ वा. पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे ट्रॅकवर आढळला. रविवारी निवसर स्टेशन मास्तर राजेंद्र सिंह मुनेश्वर चौहान यांनी पोलिस ठाण्यात फोन करुन सांगितले. की पोमेंडी बुद्रुक ते निवसर रेल्वे स्टेशन या दरम्यान एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्याचे वय अंदाजे ३१ ते ३५ आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहिले. तर तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. या प्रकरणी स्टेशन मास्तर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.



























































