टी. दिलीप संघाची साथ सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांना अखेर संघाची साथ सोडावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱयावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने दिलीप यांचा करार वाढवला नसल्यामुळे त्यांना आता संघाला निरोप द्यावा लागणार आहे. बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक वगळले असून नवे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक सुभदीप घोष यांना देण्यात आले आहे.

दिलीप हे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध होतेच, पण खेळाडूंना सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार त्यांनी सुरु केला. या पुरस्कारामुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. राहुल द्रविड यांच्यासह ते क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते. पण 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांचा करार संपला. गौतम गंभीरकडे नवे प्रशिक्षक म्हणून निवडले गेले, पण दिलीप यांचे स्थान मात्र कायम राहीले. कारण त्यांच्यासोबतचा करार बीसीसीआयने वाढवला होता. पण त्यानंतर मात्र बीसीसीआयने दिलीप यांचा करार वाढवला नसल्यामुळे त्यांना संघाची साथ सोडावी लागणार आहे.