…याकडे दुर्लक्ष केले तर जबरदस्त किंमत सरकारला मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. युवकांच्या विविध प्रश्नाबाबत कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे, अशी तरूणांची अपेक्षा आहे. त्याची सुरूवात संघर्ष यात्रेतून झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन शक्य आहे, असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे. हा प्रवास सुमारे 45 दिवसांचा आहे. ही यात्रा तरूणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेची सुरुवातही चांगली झाली आहे. युवा वर्गाचा कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला. हे या यात्रेचे यश आहे. त्यामुळे या यात्रेकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असेही पवार म्हणाले.