शेअर इट भाग १८- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

224
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

१) RBL बँक :- रत्नाकर बँक लिमिटेड

सध्याची किंमत :- रुपये ५६२

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४४ साली स्थापन झालेली रत्नाकर बँक म्हणजेच सध्याची RBL बँक. २०१० ला रत्नाकर बँक चे नामांतर RBL बँक म्हणून झाले नावाबरोबरच कंपनीने खासगी बँकच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यप्रणाली मध्ये मोठे बदल घडवत आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून दिले. कोणतीही कंपनी यशस्वी होण्यासाठी त्यामागे हुशार आणि अनुभवी माणसांची गरज असते RBL बँकेच्या बाबतीत हे तंतोतंत जुळत आहे. RBL बँक वर्षाला २५-३० % च्या विकास दराने कंपनी आपली घौड दौड करत आहेत. आपण आतापर्यंत बँक म्हणजे मुदत ठेवी किंवा कर्ज मिळण्याचे ठिकाण याप्रमाणे पाहत आलो. पण याच बँकांचे आपण कधी शेअर्स घेण्याचा विचार केला का…. नाही ना ? दीर्घकालीन मुदत ठेवीप्रमाणे आपण RBL च्या शेअर्समध्ये गुतंवणूक करू शकतो.

भविष्यातील अंदाजित किंमत (१- २ वर्ष) :- रुपये ६५० – ७००

२) HUDCO :- हाऊसिंग & अर्बन डेवेलपमेंट कोर्पोरशन

सध्याची किंमत :- ५५ रुपये

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- केंद्र सरकारच्या प्रत्येकाला २०२२ पर्यंत हिंदुस्थानाच्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात हौसिंग & अर्बन डेवेलपमेंट कोर्पोरशन (HUDCO) मोठा वाटा आहे कारण घरकुल उभारणे, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे यासाठी लागणारा वित्त कर्जे पुरवठ्याचे काम HUDCO पाहणार आहे. मे
२०१७ मध्ये शेअर बाजारात नोंदणी कृत झालेली हि कंपनी संपूर्ण सरकारी मालकीची आहे. गेल्या ४६ वर्ष्यात हौसिंग & अर्बन डेवेलपमेंट कोर्पोरशन ने घरकुल योजना आणि पायाभूत सुविधा यासाठी केलेली कामे उल्लेखनीय आहेत. भविष्यात ही कंपनी याच अग्रक्रमाने पुढे जयेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- ११०-१२० रुपये

3) Indigo :- इंटरग्लोब एविशेन

सध्याची किंमत :- १०७५ रुपये

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती:- फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात असलेले विमान प्रवास सामान्यांची खिशाला परवडणारे बजेट यात मोलाचा वाट उचलणारी कंपनी म्हणजे इंडिगो. हिंदुस्थानात राहणार्या व्यक्तीचे राहणीमान झपाटयाने वादात आहे व्यवसायाच्या रुंदावलेलया कक्षा आणि नौकरीधंद्या मध्ये देशभर पालटलेले उच्चशिक्षत वर्ग यामुळे कधीतरी विमान प्रवासाचा अनुभव घेणारे आज सहलीसाठी किंवा कार्यलयीन भेटीसाठी विमान प्रवास करत आहेत. २००९ पासून २०१७ पर्यंत प्रत्येक वर्षी नफ्यात असणारी कंपनी आणि हिंदुस्थानातील बाजारातील संधी पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी आहे. ५-१० वर्षसाठी गुंतवणुकीसाठी तुम्ही या कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता.
भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- १२००-१४०० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या