
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्न चित्रपट बनविल्याप्रकरणी पोलिसांनी 19 जुलैला अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाच्या आयुष्यात वादळ आले. अनेकांनी शिल्पाला देखील याबद्दल माहिती असल्याचा आरोप केला. पतीच्या अटकेनंतर शिल्पा अनेक दिवस प्रसिद्धी माध्यमांपासून तसेच तिच्या शूटींगपासून दूर होती. मात्र काही दिवसांपूर्वीच तिने पुन्हा एकदा शूटींगला सुरूवात केली आहे.
दरम्यान आता शिल्पाच्या खासगी आयुष्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शिल्पा शेट्टी राज कुंद्रासोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा बिटाऊनमध्ये रंगली आहे. शिल्पाच्या एका जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिली असून बॉलिवूड हंगामाने याबाबत वृत्त दिले आहे.
‘राज कुंद्राची संकंट दूर होणयाची चिन्ह नाहीत. त्याउलट दर आठवड्याला त्यात मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. शिल्पाला या प्रकरणाचा मोठा धक्का बसला आहे. शिल्पाला यातील काहीच माहित नव्हते. त्यामुळे शिल्पा्ने आता पतीच्या या गोष्टींपासून मुलांना लांब ठेवायचे ठरवले आहे. तिने मुलांना त्याच्या संपत्तीपासूनही वेगळे ठेवायचे ठरवले आहे. तिला देखील त्याच्या संपत्तीतील काहीच नको आहे. ती स्वत: व्यवस्थित कमावते त्यामुळे आता तिला राज कुंद्रा पासून वेगळे व्हायचे आहे’, असे शिल्पाच्या जवळच्या ए्का व्यक्तीने सांगितले आहे.

























































