
उदय जोशी । बीड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बीड जिल्ह्यातील दुष्काळ आढावा बैठकीत कुचकामी आधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी देऊन प्रशासनासह सरकारची दिशाभूल केली होती. असा गलथान कारभार केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात घडू नये, आधिकाऱ्यानी वास्तव आकडेवारी, दुष्काळाची सत्य परिस्थिती समोर आणावी असा सूचना वजा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची वास्तव पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल होत आहे या पार्शवभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हाप्रशासनाला सूचना वजा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मुख्यमंत्र्यासमोर अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले होते. आधिकाऱ्यानी चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा सर्वे करून योग्य आकडेवारी देण्याचे आदेश दिले गेले होते. कुचकामी अधिकार्याच्या गलथान कारभारामुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्थाची थट्टा होऊ नये, दुष्काळ भीषण आहे, या दुष्काळाचे वास्तव केंद्रीय पथकासमोर आले पाहिजे. काही अधिकाऱ्यांच्या आळशीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये याची खबरदारी जिल्हाप्रशासनाने घ्यावी, असे अनिल जगताप यांनी म्हटले आहे.




























































