
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले व शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यासही बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोनच शब्दात प्रतिक्रीया दिली आहे.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या सोबत त्यांनी ‘जिंकून दाखवणारच’ असे पोस्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर शिवसैनिकांनी प्रतिक्रीया देत विजय आपलाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयानंतर व्यक्त केला आहे. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेनेचे चिन्ह गोठविण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी फेसबुकवरही हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता पोस्ट करून लढण्याचा निर्धार केला आहे. हरिवंशराय म्हणतात, ‘तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुडेगा कभी… कर शपथ! कर शपथ! कर शपथ!… अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!’
View this post on Instagram






























































