
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. राज्यसभेवर चौथ्यांदा निवड झाल्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यसभेवर सलग चौथ्यांदा निवडून जाण्याची संधी दिल्याबद्दल राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, अनिल देसाई आणि मिलींद नार्वेकर उपस्थित होते.
आज मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.सलग चौथयांदा राज्यसभेवर निवडून जाण्याची संधी दिल्याबद्दल मी उद्धवजींचे आभार मानले
या वेळी श्री. आदित्य ठाकरे,श्री. एकनाथ शिंदे,श्री.अनिल परब.श्री. अनिल देसाई व श्री मिलींद नार्वेकर उपस्थीत होते.
जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/h8rQWbeRZt— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2022
























































