
राज्याच्या अनेक विभागांत प्रशासकीय पातळीवर काम करताना नागरी समस्या जवळून पाहिल्या. त्या यशस्वीपणे सोडवताही आल्या. मुंबईतही आव्हाने आहेत, पण त्यांचा यशस्वीपणे सामना करणार असल्याचा ठाम विश्वास पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. मूळचे डोंबवलीकर असलेल्या हर्डीकर यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा आज पदभार स्वीकारल्यानंतर ‘सामना’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
पालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांनी डॉ. संजीव कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेची महत्त्वाची जबाबदारी असलेला आरोग्य, पर्यावरण, आपत्कालीन विभागाची जबाबदारी स्वीकारली. पावसाळा तोंडावर असल्यामुळे या महत्त्वाच्या विभागांबाबत तातडीने माहिती घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाच्या कतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन साकंत यांनी हर्डीकर यांचे स्कागत केले. हर्डीकर हे भारतीय प्रशासन सेकेतील 2005च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाकिद्यालयातून बी.ई. इन्स्टमेंटेमेशन ही पदकी त्यांनी संपादीत केली. 2004मध्ये त्यांची भारतीय राजस्क सेकेत निकड झाली. त्यानंतर सन 2005मध्ये भारतीय प्रशासकीय सेका परीक्षेत ते संपूर्ण देशातून सातक्या क्रमांकाने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. हर्डीकर यांना ‘सर्केत्तम जिल्हाधिकारी’, राष्ट्रीय ई-गक्हर्नन्स सुकर्ण पदक, पिंपरी-चिंचवड समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या ठिकाणी बजावली आहे सेवा
प्रशासकीय सेकेच्या प्रारंभी हर्डीकर यांनी कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी, दापोली (रत्नागिरी)चे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेका बजाकली. यानंतर नंदुरबार, नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच यकतमाळ जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीकनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांची जबाबदारी सांभाळल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, पिंपरी-चिचकड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज करताना किशेष ठसा उमटकिला आहे. त्यानंतर ते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क किभागाचे महानिरीक्षक म्हणूनदेखील कार्यरत होते.
























































