मतदारांना त्रास देण्यासाठी SIR चा वापर केला जात आहे, अखिलेश यादव यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेचा वापर मतदारांना त्रास देण्यासाठी केला जात आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी केला. तसेच हा मुद्दा घेऊन त्यांचा पक्ष जनतेमध्ये जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ANI ने यासंदभात वृत्त दिले आहे.

अखिलेश यादव म्हणाले, “समाजवादी पक्ष संघर्ष करत आहे. आम्ही नुकताच लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव केला आहे आणि आम्ही हे सर्व मुद्दे जनतेसमोर मांडू. राजकीय पक्षांनी आंदोलने करू नयेत म्हणून ते एसआयआर आणतात, कारण शेवटी मतदारच त्यांचा पराभव करणार आहेत. तुम्हाला सातत्याने त्रास देण्यासाठीच एसआयआरचा वापर केला जात आहे.”

ते म्हणाले आहे की, या पुनरिक्षण प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींमुळे लोकांना त्यांच्या नागरिकत्वाबाबतच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मी ऐकले आहे की, एसआयआरमधून नावे गायब असल्यामुळे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींनाही त्यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. जरा विचार करा, या नोकरशाहीच्या चक्रव्यूहात आपल्याला किती खोलवर अडकवले जात आहे.”